पावसाळ्यात ट्राय करा गरमागरम पनीर लॉलीपॉप; 10 मिनिटांत होईल तयार
Paneer Lollipop Recipe: पावसाळा कोणाला आवडत नाही? या ऋतूत काही चविष्ट पदार्थ मिळाले तर आनंद द्विगुणित होता. पावसाळ्यात प्रत्येक वेळी भजी खाण्याचा कंटाळा येत असेल तर यावेळी पनीर लॉलीपॉप ट्राय करुन पहा. पनीर लॉलीपॉप बनवणे खूप सोप्पे आहे. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया रेसिपी...
साहित्य
1 कप पनीर
2 उकडलेले बटाटे
2 हिरव्या मिरच्या
1/2 शिमला मिर्ची
1 चम्मच आलं
1 चम्मच लसूण
1/2 चम्मच जीरा पावडर
1/2 चम्मच गरम मसाला पावडर
1/2 चम्मच चाट मसाला
1/4 वाटी चिरलेली कोथिंबीर
मीठ स्वादानुसार
लाल मिर्च पावडर स्वादानुसार
1 कप ब्रेड क्रंप्स
1 /2 कप मैदा
कृती
पनीर लॉलीपॉप बनवण्यासाठी प्रथम ताजे पनीर आणि उकडलेले बटाटे घ्या. या दोन्ही गोष्टी किसून घ्या आणि एका भांड्यात काढा. चमच्याच्या मदतीने ते चांगले मिसळा. यानंतर शिमला मिर्ची नीट धुवून बारीक चिरून घ्यावी. आता किसलेले पनीर आणि बटाटे यामध्ये चिरलेली शिमला मिर्ची आणि सर्व मसाले घालून मिक्स करा. यानंतर, मिश्रण 10 मिनिटे झाकून ठेवा आणि सेट करण्यासाठी ठेवा.
ठराविक वेळानंतर तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून बाजूला ठेवा. यानंतर एका भांड्यात मैदा आणि पाणी एकत्र करून पातळ पीठ तयार करा. ब्रेडचे तुकडे दुसर्या प्लेटवर पसरवून ठेवा. आता गोळे प्रथम पिठाच्या द्रावणात बुडवा आणि नंतर ब्रेड क्रंप्सने गुंडाळा. त्याचप्रमाणे सर्व गोळे तयार करा. कढईत तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात सर्व गोळे टाका आणि सोनेरी होईपर्यंत तळा. यानंतर मधोमध टूथ पिक किंवा स्टिक ठेवा आणि चटणीसोबत सर्व्ह करा.