इडलीला द्या चविष्ट ट्विस्ट; 'या' रेसिपीपुढे फिकी पडेल आलू चाट
Idli Chaat Recipe : दक्षिणात्य पदार्थ म्हंटले तर डोसा, इडली-सांबार, वडा-सांबार असे पदार्थ डोळ्यासमोर आपसूकच तरळून जातात. पण, तुम्हाला इडली-सांबार किंवा साधी इडली खाण्याचा कंटाळा आला असेल तर आता इडलीला चविष्ट ट्विस्ट द्या. ही रेसिपी फक्त 30 मिनिटांत बनवता येते. आम्ही तुम्हाला इडली चाटची रेसिपी सांगणार आहोत. ही चाट रेसिपी हलकीशी मसालेदार आणि खाण्यास अतिशय आरोग्यदायी आहे.
साहित्य
5 इडल्या
3 चमचे तांदूळ पावडर
1 टीस्पून काश्मिरी मिरची पावडर
1/2 टीस्पून हिंग
आवश्यकतेनुसार मीठ
1/2 कप पाणी
१ कप दही
1/2 कप किसलेले खोबरे
2 हिरव्या मिरच्या
१ इंच आले
कोथिंबीर
1/4 टीस्पून मोहरी
एक चमचा उडीद डाळ
2 कांदे
आवश्यकतेनुसार कढीपत्ता
रेसिपी
ही रेसिपी बनवण्यासाठी प्रथम इडलीचे चौकोनी तुकडे करा. यानंतर तांदळाची पूड, हिंग पावडर, मीठ आणि पाणी एकत्र करून पातळ पीठ बनवा. यानंतर एका पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा. तेल चांगले तापल्यावर या इडलीचे चौकोनी तुकडे पिठात बुडवून सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. इडल्या बनवल्या की बाजूला ठेवा.
चटणी बनवण्यासाठी किसलेले खोबरे, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर आणि मीठ एकत्र बारीक करून घ्या. थोडे दही फेटून घ्या. त्यात २ चमचे कोथिंबिरीची चटणी घालून मिक्स करा. आता चवीनुसार मीठ घाला.
कढईत तेल मध्यम आचेवर गरम करून त्यात उडीद डाळ सोबत मोहरी घाला. ते तळून घ्या आणि नंतर त्यात आले, कांदा आणि हिरवी मिरची घाला. कांद्याचा रंग सोनेरी होईपर्यंत परता. गॅस बंद करा आणि तळलेली इडली दह्यात मिक्स करा. तळलेले कांदे घाला, वरून चिरलेली कोथिंबीर घाला आणि शेवटी तिखट घालून सजवा. तुमची इडली चाट आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.