तुम्ही कधी मुरमुऱ्यांचे वडे खाल्ले आहेत का? नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत मुरमुऱ्यांच्या वड्या
google

तुम्ही कधी मुरमुऱ्यांचे वडे खाल्ले आहेत का? नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत मुरमुऱ्यांच्या वड्या

वड्यांमध्ये अनेक प्रकारचे वडे खाल्ले जातात. पण कधी मुरमुऱ्यांच्या वड्या तुम्ही चाखल्या आहेत का? पावसाळा सुरू झालाय पावसाळ्यात नवनवीन मसालेदार पदार्थ खाण्यात वेगळाच आनंद मिळतो. अशाच नवीन पदार्थांसह आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खमंग मुरमुऱ्यांच्या वड्या.
Published by :
Team Lokshahi
Published on

मुरमुऱ्यांच्या वड्यांसाठी लागणारे साहित्य:

मुरमुरे

कांदे

हिरवी मिरची

तांदळाचे पिठ

तिखट मसाले

आले-लसूण पेस्ट

दही

कढीपत्ता

मुरमुऱ्यांच्या वड्या बनवण्याची कृती:

एका बाऊलमध्ये मुरमुरे पाण्यात भिजत ठेवा. मुरमुरे मऊ झाल्यास त्यातुन पाणी वेगळे करून मुरमुरे हलक्या हाताने मॅश करा. मॅश केलेल्या मुरमुऱ्यांमध्ये हिरवी मिरची बारीक चिरुन टाका. त्याचसोबत कढीपत्ता, आल्याची पेस्ट, धने, जिरे, तिखट मसाले, चविनुसार मीठ, तांदळाचे पीठ, दही इत्यादी घालून संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्या. त्यानंतर त्याला वड्यांचा आकार देऊन त्यांना तेलात तळून घ्या, अशा प्रकारे तुमच्या खुसखुशीत मुरमुऱ्यांच्या वड्या तयार, हे वडे तुम्ही कोणत्याही सॉससोबत किंवा गरम गरम चहासोबत खाऊ शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com