fenugreek leaves: शेवग्याच्या शेंगांची भाजी आवडते? मग शेवग्याच्या पानांची चवदार भाजी देखील खाऊन पाहाच
श्रावण महिना सुरु होताच पाले भाज्या आणि रानभाज्या मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात. अशा वेळीस शेवग्याच्या शेंगांचे सेवन प्रत्येकाच्या घरी आवडीने केले जाते. पण तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का? शेवग्याच्या शेंगांप्रमाणेच शेवग्याच्या पानांची देखील भाजी केली जाते. ही भाजी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. जाणून घ्या ही भाजी बनवण्याची रेसिपी.
शेवग्याच्या पानांची बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
जीरे
कांदा
आले- लसूण
तांदळाचे पीठ
शेवगाची पाने
मीठ
शेवग्याच्या पानांची बनवण्याची कृती:
सर्वात आधी शेवग्याची पाने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर शेवग्याची पाने बारीक कापून घ्या. ही चिरलेली शेवग्याची पने तांदळाच्या पीठात मिक्स करा. यानंतर एका बाजूला गॅसवर कढईत तेल गरम करत त्यात जीरे, चिरलेला कांदा आणि तिखट लाल मसाले तसेच आले-लसूण पेस्ट परतून घ्या. यानंतर यात शेवग्याची शिरलेली भाजी टाका आणि मंद आचेवर छान शिजवून घ्या आणि त्यात चविनुसार मीठ टाका. अशा प्रकारे तुमची शेवग्याच्या पानांची भाजी तयार होईल आणि याचा आनंद तुम्ही भाकरी सोबत घेऊ शकता.