maggi bhel recipe : पटकन वाचा, झटकन बनवा, मसालेदार मॅगी भेळ!

maggi bhel recipe : पटकन वाचा, झटकन बनवा, मसालेदार मॅगी भेळ!

मॅगी हा पदार्थ आपल्या सगळ्यांनाच आवडतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण आवडीने हा पदार्थ खातो.
Published by :
Team Lokshahi
Published on

maggi bhel recipe : मॅगी हा पदार्थ आपल्या सगळ्यांनाच आवडतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण आवडीने हा पदार्थ खातो. विशेष म्हणजे मॅगी बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. प्रत्येकाच्या घरात मॅगी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. पण तुम्ही कधी मॅगी भेळचा आस्वाद घेतला आहे का? नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मॅगी भेळ बनवण्याची ही खास रेसिपी.

मॅगी भेळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

1 पॅकेट मॅगी

1/2 गाजर

1/2 अर्धा कांदा

1/2 काकडी

1 टोमॅटो

2 हिरवी मिरची

1 चमचा कोथिंबीर

1 वाटी भाजलेले शेंगदाणे –

1 बटर क्यूब

1/2 टीस्पून लाल तिखट

1/2 टीस्पून मॅजिक मसाला

1 टीस्पून रेड चिली सॉस

1 टीस्पून टोमॅटो सॉस

मीठ चवीनुसार

कृती

मॅगी भेळ बनवण्यासाठी आधी मॅगीला क्रश करून घ्यावे. त्यानंतर एका कढईत बटरचा तुकडा टाकून तो वितळवून घ्यावा. यानंतर त्यात मॅगी घालून साधारण १० मिनिटे तळून एका बाऊलमध्ये बाहेर काढा. नंतर कांदा, गाजर, काकडी, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर अशा सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घ्याव्यात. मग भाजलेल्या मॅगीमध्ये टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस १-१ चमचा घालून मिक्स करावे. सोबतच भाजलेले शेंगदाणे, मीठ, मॅगी मसाला आणि लाल तिखट घाला. यानंतर त्यात सर्व चिरलेल्या भाज्या घालून नीट मिक्स करून घ्यावे. आपली मसालेदार मॅगी भेळ तयार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com