श्रावणात करा साजूक तूपात बनवलेला मूग डाळीचा लाडू

श्रावणात करा साजूक तूपात बनवलेला मूग डाळीचा लाडू

श्रावण महिन्यापासून सणांना सुरुवात होते आणि गोड पदार्थ बनवण्यासाठी काय बनवावं असा प्रश्न पडतो. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय साजूक तूपात बनवलेला मूग डाळीचा लाडू, सण-समारंभाला मूग डाळीचा लाडू तुम्ही गोड पदार्थासाठी बनवू शकता.
Published by :
Team Lokshahi
Published on

मूग डाळीचा लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

तूप

मूग डाळ

साखर

ड्रायफ्रूट्स

मूग डाळीचा लाडू बनवण्याची कृती:

सर्वात आधी मूग डाळ एका पॅनमध्ये गोल्डन ब्राऊन रंगाची होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर भाजलेली मूग डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्याचसोबत नंतर साखर बारीक करून घ्या किंवा पिठीसाखरेचा वापर करा. पॅनमध्ये भाजलेली मूग डाळ पिठीसाखरे सोबत किंवा बारीक केलेल्या साखरेसोबत साजूक तूप घालून एकजीव करून घ्या.

त्यानंतर ड्रायफ्रूट्सचे बारीक तुकडे करून घ्या आणि ते सुद्धा पॅनमध्ये परतून घ्या. यानंतर तयार झालेल्या मिश्रणाचे गोल आकारात लाडू वळून घ्या. अशाप्रकारे श्रावण महिन्यासाठी तसेच सण-समारंभसाठी गोड आणि साजूक तूपात केलेल्या लाडूचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com