Bhaubeej 2023: भाऊबीजसाठी करा ‘या’ खास झणझणीत नॉनव्हेज रेसिपीचा बेत

Bhaubeej 2023: भाऊबीजसाठी करा ‘या’ खास झणझणीत नॉनव्हेज रेसिपीचा बेत

सण-उत्सव म्हटलं की घराघरांमध्ये खमंग पदार्थांच्या मेजवानीचा खास बेत आखला जातोच. यातही दिवाळी सण म्हणजे दिव्यांचा उत्सव आणि स्वादिष्ट पक्वान्नांची मेजवानी.
Published by  :
shweta walge

सण-उत्सव म्हटलं की घराघरांमध्ये खमंग पदार्थांच्या मेजवानीचा खास बेत आखला जातोच. यातही दिवाळी सण म्हणजे दिव्यांचा उत्सव आणि स्वादिष्ट पक्वान्नांची मेजवानी. देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करून दिवाळी जल्लोष साजरी केली जाते. भाऊबीजेच्या दिवशीही लज्जतदार व स्वादिष्ट पदार्थांचा बेत आखला जातो. काही जणांच्या घरी नॉनव्हेज पदार्थ तयार केले जातात. आम्ही भाऊबीजसाठी काही खास नॉनव्हेज रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहत. दुपारच्या जेवणाला आपल्या लाडक्या भावासाठी हे नॉनव्हेज पदार्थ नक्की ट्राय करा. या रेसिपीनं तुमची भाऊबीज होईल एकदम खास.

चिकन कटलेट

सामग्री

५०० ग्रॅम बॉइल्ड चिकन, उकडलेले बटाटे - तीन, दोन ते तीन मध्यम आकाराचे चिरलेले कांदे

बारीक चिरलेले लसूण, किसलेले आले, दोन ते तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्या, दोन चमचे मिरपूड, तीन चमचे धणे पूड

दोन चमचे लाल तिखट, दीड चमचा चिकन मसाला, एक चमचा गरम मसाला, चार ते पाच हिरव्या मिरच्या

थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग, तळण्यासाठी तेल, पाच ब्रेडचे स्लाइस, दोन अंडी

कृती

चिमूटभर हळद, मिरपूड आणि व्हिनेगर घालून ३-४ शिट्ट्या येईपर्यंत चिकन शिजवून घ्या. शिजलेलं चिकन एका मोठ्या बाउलमध्ये काढा. चिकन मॅश करून घ्या. दुसऱ्या बाउलमध्ये उकडलेले बटाटे मॅश करा.

पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेलामध्ये मोहरी, बारीक चिरलेले लसूण, आले आणि कढीपत्ताही घालावा. यानंतर दोन ते तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्याही मिक्स करा. चवीनुसार मीठ घालून सर्व सामग्री नीट फ्राय करा.

यानंतर पॅनमध्ये चिरलेले कांदे घाला. नंतर चिकन मसाला, गरम मसाला, दोन चमचे लाल तिखट आणि तीन चमचे धणे पूड घालून सर्व सामग्री नीट ढवळून घ्या.

मसाल्यामध्ये मॅश केलेले चिकन मिक्स करा. थोडंसं चिकन स्टॉकही घाला.

यानंतर पॅनमध्ये मॅश केलेले बटाटे घालून सर्व सामग्री पाच मिनिटे शिजू द्यावी.

चिकन रोस्ट

सामग्री: ७५० ग्रॅम चिकन, चार मध्यम आकाराचे चिरलेले कांदे, चार चमचे चिल्ली फ्लेक्स, एक चमचा व्हिनेगर, तीन चमचे किसलेले आले, तीन चमचे चिरलेले लसूण, पाच चमचे तेल, एक वाटी कढीपत्ता, तूप किंवा बटर, चवीनुसार मीठ

पाककृती

 • एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. यानंतर तेलात एका वाटी कढीपत्ता परतून घ्यावा. यानंतर चिरलेले कांदे, चवीनुसार मीठ, व्हिनेगर, बारीक चिरलेले लसूण आणि किसलेले आले टाकून २-३ मिनिटे सर्व सामग्री परतून घ्यावी.

 • आता मसाल्यामध्ये चिकन आणि चिली फ्लेक्स घाला. सर्व सामग्री नीट शिजू द्या. थोडे पाणी घालून सर्व मिश्रण ढवळा.

 • चिकनची चव वाढवण्यासाठी वरून थोडेसे बटर किंवा तूप घालू शकता.

 • तयार झालं आहे गरमागरम चिकन रोस्ट.

पेपर चिकन

सामग्री: अर्धा किलो चिकन, एक चमचा तेल, चिरलेले कांदे - दोन, चिरलेले टोमॅटो - दोन, हिरव्या मिरच्या - तीन, दीड चमचा आले- लसूण पेस्ट, दीड चमचा मिरपूड, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, तेल आणि पाणी

पाककृती

 • का कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात दोन चिरलेले कांदे परतून घ्या. यानंतर चिरलेले टोमॅटो सुद्धा फ्राय करा.

 • कढईत मीठ टाकून सामग्री चार ते पाच मिनिटे शिजवावी.

 • यानंतर आले-लसूण पेस्ट, चिरलेली हिरवी मिरची, हळद आणि मिरपूड घाला. सर्व सामग्री शिजू द्यावी.

गार्लिक चिकन 

सामग्री

 • १ किलो चिकन

 • १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

 • ३ ते ४ लसूणचे कांदे

 • ४०० ग्रॅम दही चिकन मसाला गरम मसाला

 • हळद, कसूरी मेथी

 • काश्मिरी मिर्च पावडर चवीनुसार मीठ

पाककृती

 • प्रथम चिकनला मीठ लावून स्वच्छ धुवून घ्या. लसूण बारीक चिरून घ्या.

 • एका भांडयात चिकन घेऊन त्याला ४०० ग्रॅम दही, एक चमचा तेल, मीठ, बारीक चिरलेला लसूण, हळद, १ चमचा काश्मिरी मिरची पावडर लावून ३ ते ४ तास मेरिनेट करण्यास ठेवावे.

 • नंतर एका पसरट कढईमध्ये तेल तापवून त्यात मॅरिनेटेड चिकन घालावे व मध्यम आचेवर झाकण ठेऊन शिजवावे.

 • गॅसवरून उतरवण्याच्या १० मिनिटे अगोदर त्यात कस्तूरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा काश्मिरी मिरची पावडर, चिकन मसाला, गरम मसाला टाकून झाकण काढून ग्रेव्ही थोडी घट्ट होऊ द्या

 • चिकनच्या तुकडयांना हात न लावता चमच्याने ग्रेव्ही थोडी ढवळा व गॅस बंद करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com