नाचणी, ओट्स आणि ड्रायफ्रूट्स 'या' तीन गोष्टींपासून बनवा घरच्याघरी केक

नाचणी, ओट्स आणि ड्रायफ्रूट्स 'या' तीन गोष्टींपासून बनवा घरच्याघरी केक

वाढदिवस असो किंवा कोणता खास दिवस केक हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय फक्त तीन गोष्टींपासून घरच्याघरी सोप्या पद्धतीने बनवला जाणारा ड्रायफ्रूट्स केक.
Published by :
Team Lokshahi
Published on

ड्रायफ्रूट्स केकसाठी लागणारे साहित्य:

नाचणी

ओट्स

ड्रायफ्रूट्स

बेकिंग सोडा

लोणी

दूध

पिठीसाखर

ड्रायफ्रूट्स केक बनवण्याची कृती:

एका मिक्सर जाळी भांड्यात दूध आणि खजूर मिक्स करा आणि त्याची पेस्ट करा. यानंतर या मिश्रणात साखर आणि लोणी मिक्स करा. तयार केलेल्या पेस्टमध्ये बेकिंग सोडा, ओट्स, ड्रायफ्रूट्स, नाचणी पीठ इत्यादी साहित्या मिक्स करा. यानंतर तयार केलेले मिश्रण मायक्रोवेव्ह-सेफ भांड्यात केकचे तयार केलेले मिश्रण घाला. आता ओव्हन मध्ये भांडे ठेवा आणि केक बेक करण्यासाठी ठेवा. 10 मिनिटींनी केक बाहेर काढा आणि सजावटीसाठी केकवर ड्रायफ्रूट्सचे तुकडे सजवा. अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने घरगुती ड्रायफ्रूट्स केक तयार.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com