'या' दिवाळीत घरच्या घरी क्रिस्पी जिलेबी बनवा; वाचा रेसिपी

'या' दिवाळीत घरच्या घरी क्रिस्पी जिलेबी बनवा; वाचा रेसिपी

दिवाळी हा सण जसा प्रकाशाचा सण आहे तसाच गोडीचाही आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दिवाळी हा सण जसा प्रकाशाचा सण आहे तसाच गोडीचाही आहे. मिठाईशिवाय दिवाळी अपूर्ण आहे. दिवाळीच्या आठवडाभर आधी घरोघरी मिठाई बनवायला सुरुवात होते. दिवाळीच्या सणाशी एक परंपरा अशीही जोडली जाते की या दिवशी घरी येणाऱ्या पाहुण्यांना नक्कीच गोडधोड करून दिला जातो. तसंच कुणाच्या घरी गेलं तरी मिठाई नेण्याची प्रथा आहे. अशा परिस्थितीत मिठाईमध्ये विविधता असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला या दिवाळीत पाहुण्यांना खुसखुशीत जिलेबीची चव द्यायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत.

जिलेबी बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

मैदा

बेकिंग पावडर

कॉर्न फ्लोर

पिवळा रंग

तेल किंवा तूप

दही

साखर

पाणी

जिलेबी बनवण्यासाठी आधी मैद्याचे पीठ तयार करावे लागेल. यासाठी एका मोठ्या भांड्यात मैदा, बेकिंग सोडा, कॉर्नफ्लोअर आणि पाणी एकत्र करून जिलेबीसाठी द्रावण तयार करा. हे द्रावण चांगले फेटावे लागते. हे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे. आता या द्रावणात दोन चमचे दही घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात पिवळा रंग टाका.

साखरेचा पाक तयार करण्यासाठी साखर आणि पाणी समान प्रमाणात घेऊन साखरेचा पाक तयार करा. आता जिलेबी तळण्यासाठी वोक गरम करून त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर सुती कापडात जिलेबीचे द्रावण भरून जिलेबी तळून घ्या आणि जिलेबीचा आकार तयार करा. जिलेबी चांगली परतून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. आता ही जिलेबी तेलातून काढून साखरेच्या पाकामध्ये टाका आणि नंतर सर्व्ह करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com