चटकदार
Krishna Janmashtami: कृष्ण जन्माष्टमीनिमित्त बालगोपाळासाठी बनवा घरच्याघरी स्वादिष्ट लोणी
गोकुळाष्टमी जवळ आली आहे. बालगोपाळाला आवडणारे लोणी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरच्याघरी तयार करा कृष्ण जन्माष्टमीनिमित्त स्वादिष्ट लोणी.
लोणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:
१ लिटर दुध
साखर
दही
लोणी बनवण्याची कृती:
सर्वात आधी दूध गरम करण्यासाठी ठेवा उकळलेले दूध थोडावेळ थंड होण्यासाठी ठेवा. दूध थंड झाल्यामुळे त्यातून मलाई काढणं सोप जाईल. दूध थंड झाल्यावर त्यातून मलाई वेगळी करा. यानंतर वेगळे केलेल्या मलाईत दही मिक्स करा आणि हे मिश्रण 10 ते 15 तास तसेच ठेवा. आता तयार झालेले मिश्रण तोपर्यंत ढवळत राहा जोपर्यंत त्यातून पाणी वेगळे होत नाही. अशा प्रकारे लोणी वर यायला लागले. हे वर आलेले लोणी एका वाटीमध्ये काढुन घ्या. अशा प्रकारे स्वादिष्ट लोणी तयार होईल हे लोणी तुम्ही साखरे सोबत देखील खाऊ शकता.