dudhibhopla thalipith
dudhibhopla thalipithgoogle

लहान मुलं दुधी भोपळा खाण्यासाठी नाही म्हणतात का? मग झटपट बनवा गरमागरम स्वादिष्ट दुधीचे थालीपीठ

बऱ्यादा घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना दुधी भोपळ्याची भाजी ही न आवडणारा पदार्थ आहे. पण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय दुधीचे चटपटीत थालीपीठ जे लहान तसेच घरातील मोठी माणसं ही फस्त करतील.
Published by :
Team Lokshahi
Published on

दुधीचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

दुधी भोपळा

हिरव्या मिरच्या

कांदा

आले-लसूण पेस्ट

कढीपत्ता

कोथिंबीर

तेल

ज्वारीचे पीठ

बाजरीचे पीठ

गव्हाचे पीठ

तांदुळाचे पीठ

दुधीचे थालीपीठ बनवण्याची कृती :-

सर्वप्रथम दुधी बारीक किसून घ्यावी त्यानंतर कांदा आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरुन घ्यावे. बारीक किसलेली दुधी, चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या तसेच कोथिंबीर, धणे पूड, आले-लसूण, कढीपत्ता, हळद, तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ यासर्वांची पेस्ट करून घ्यावी. नंतर एका बाऊलमध्ये ज्वारी, बाजरी, तांदुळ आणि गव्हाचे पीठ एकत्रित करुन घ्यावे.

पीठात थोडे पाणी घालून पीट मळून घ्यावे. मळलेल्या पीठाचे लहान गोळे करून ते एका कॉटनच्या रुमालावर गोलाकार आकारात थालीपीठासारखे थापून घ्यावे. नंतर त्यावर पांढरे तीळ घालावे. शेवटी गोलाकार आकारात थापून घेतलेले थालीपीठ तव्यावर गरम तेल सोडून दोन्ही बाजूंनी शेकवून घ्यावे. अशा प्रकारे गरमागरम दुधीचे थालीपीठ एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घ्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com