चटकदार
बाप्पासाठी बनवा पान गुलकंदाचे मोदक,वाचा रेसिपी
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत गणपतीला 10 वेगवेगळ्या वस्तू अर्पण केल्या जातात.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत गणपतीला 10 वेगवेगळ्या वस्तू अर्पण केल्या जातात. गणेश चतुर्थीचा सण मोदकाशिवाय अपूर्ण मानला जातो. गणेश चतुर्थीला खास बनवण्यासाठी आणि गणपतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही घरीच पान गुलकंदाचे मोदक तयार करु शकता.
2 कप किसलेले नारळ
7 विड्याची पाने
तूप
कंडेन्स्ड मिल्क
हिरवा रंग
गुलकंद
ड्राय फ्रूट्स पावडर
एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात किसलेले नारळ पावडर घाला २-३ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या. कंडेन्स्ड मिल्कमध्ये ४ विड्याची पाने फेटून घ्या. आता पॅनमध्ये ते पानाचे मिश्रण घालून चांगले मिक्स करा. हिरवा कलर त्यामध्ये थोडासा हवा असल्यास टाका. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅसवरून काढून थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर हातावर तूप लावून पानाचे मिश्रण मोदकाच्या साच्यात ठेवा आणि त्यात मधोमध गुलकंद, ड्रायफ्रुट्स याचे सारण भरा. सर्व बाजूने नीट बंद करा.