'या' जन्माष्टमीला घरीच बनवा भोपळ्याचा हलवा,  ही घ्या सोपी रेसेपी

'या' जन्माष्टमीला घरीच बनवा भोपळ्याचा हलवा, ही घ्या सोपी रेसेपी

जन्माष्टमीचा सण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरा केला जातो.
Published by  :
shweta walge

जन्माष्टमीचा सण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरा केला जातो. श्रीकृष्णाचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी हेल्थी आणि स्वीट पाहिजे? तर ट्राय करा ही रेसिपी. या जन्माष्टमीला घरीच बनवा भोपळ्या पासून हा गोड पदार्थ.

साहित्य

भोपळा - 1 किलो, दालचिनी - १ १/२, पाणी - 150 मि.ली, तूप - ४ चमचे, मनुका - 50 ग्रॅम, साखर - 150 ग्रॅम, किसलेले नारळ (भाजलेले नारळ) - 2 चमचे, बदाम (चिरलेला) - २ चमचे

कृती

भोपळा हलवा बनवण्यासाठी प्रथम कढईत भोपळा, पाणी आणि दालचिनी टाकून झाकण ठेवून मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर भोपळा मॅश करा. आता एका मोठ्या कढईत ४ चमचे तेल गरम करा, त्यात भोपळा घाला आणि सतत ढवळत राहा.

प्युरी घट्ट झाली आणि रंग बदलला की आणखी 10 मिनिटे शिजवा. आता त्यात साखर घाला आणि हलवा शिजेपर्यंत परता. तुमचा 'भोपळ्याचा हलवा' तयार आहे. सर्व्हिंग डिशमध्ये काढा, त्यात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स टाका आणि नारळाने सजवा.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com