Masala Bhindi Recipe : झणझणीत मसाला भेंडीची रेसिपी जाणून घ्या...
Masala Bhindi Recipe : मसाला भेंडी असो किंवा साधी भेंडी असो बरेच लोकांची फेवरेट डिश आहे. भेंडीची भाजी विविध पद्धतीने तयार केली जाते. त्यामध्ये भेंडी फ्राय, पंजाबी मसाला भेंडी, ग्रेव्ही भेंडी अशा विविध पद्धतीने भेंडी केली जाते. बऱ्याच लोकांना भेंडीची भाजी आवडत नाही. परंतु आपण जर एकदा मसाला भेंडी रेसिपी तयार करून बघितली तर ती सर्वांनाच आवडेल व भेंडीची भाजी खाण्याची आवड तुमची दुप्पट होईल. तर चला मग जाणून घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य व पाककृती.
साहित्य
एक पाव भेंडी चिरलेली
एक टोमॅटो बारीक चिरलेला
एक कांदा बारीक चिरलेला
तेल
चवीनुसार मीठ
एक चमचा आलं लसूण पेस्ट
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा जिरेपूड
लाल तिखट पाव चमचा
धने पावडर अर्धा चमचा
आमचूर पावडर पाव चमचा
चाट मसाला पाव चमचा
गरम मसाला पाव चमचा
कसुरी मेथी अर्धा चमचा
कृती :
मसाला भेंडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक आकडांमध्ये तेल घालून सर्व भेंडी हलकी अशी तळून घ्यायचे आहे. नंतर हे सर्व भेंडी एका प्लेटमध्ये काढून घ्या व उरलेल्या तेलामध्ये जिरे, कांदा, आल लसूण पेस्ट घालून चांगली परतून घ्या. कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाका व एक मिनिटं पुन्हा परतून घ्या. नंतर त्यामध्ये हळद, धने पूड, तिखट, जिरेपूड टाकून दोन मिनिटं आणखीन शिजवून द्या. नंतर त्यामध्ये गरम मसाला चाट मसाला आमचूर पावडर कसुरी मेथी आणि मीठ टाकून छान शिजवून घ्या. मसाला छान परतून झाला की, त्यामध्ये भेंडी टाकून दहा मिनिटे पुन्हा परतून घ्या. आता गॅस बंद करा व त्यावर कोथिंबीर घालून पोळी पराठ्यासोबत सर्व्ह करा. तुम्ही ही रेसिपी भाताबरोबरही खाऊ शकता.