'या' खास पद्धतीने बनवा सुपर टेस्टी पनीर फ्राईड राईस

'या' खास पद्धतीने बनवा सुपर टेस्टी पनीर फ्राईड राईस

सध्या श्रावण महिना सुरु आहे. यामुळे अनेकांच्या घरात नॉनव्हेजवर प्रतिबंध आहे. अशात तुम्हाला बिर्याणी खायची इच्छा होत असेल तर पनीर फ्राईड राईस हा उत्तम पर्याय आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Paneer Fried Rice recipe : सध्या श्रावण महिना सुरु आहे. यामुळे अनेकांच्या घरात नॉनव्हेजवर प्रतिबंध आहे. अशात तुम्हाला बिर्याणी खायची इच्छा होत असेल तर पनीर फ्राईड राईस हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही नॉर्मल व्हेज फ्राईड राईस ऐवजी पनीर फ्राईड राइस बनवलात तर सगळ्यांनाच त्याची चव आवडेल आणि प्रत्येकजण तुमची प्रशंसा करेल. या डिशमध्ये पनीरसोबत तुम्ही कोबी, गाजर आणि शिमला मिरची यांसारख्या भाज्या टाकू शकता. प्रथिने आणि फायबरपासून बनवलेला हा पदार्थ आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

साहित्य

150 ग्रॅम पनीर

2 टोमॅटो

2 पाकळ्या लसूण

आवश्यकतेनुसार रिफाइंड तेल

आवश्यकतेनुसार मीठ

1 मूठभर कोथिंबीर पाने

२ कप उकडलेला बासमती तांदूळ

1 कांदा

१/२ कप कोबी

1 टीस्पून मसाला मिरची पावडर

1/2 टीस्पून काळी मिरी

1 1/2 टीस्पून सोया सॉस

कृती

पनीर फ्राईड राईस ही रेसिपी बनवण्यासाठी प्रथम भाज्या धुवून आणि चिरून घ्या. यानंतर पनीरचे तुकडे करा. आता एक कढईत तेल टाका, तेल पुरेसे गरम झाल्यावर त्यात कांदा आणि लसूण पाकळ्या घाला, 2 मिनिटे परतून घ्या. त्यात आता टोमॅटो आणि कोबी घालून तळून घ्या. कढईत भाज्या शिजून हलक्या सोनेरी तपकिरी झाल्या की त्यात सोया सॉस आणि मसाले घाला. तांदूळ धुवून उकळवा. आता उकडलेले किंवा उरलेला भात आणि पनीर घाला आणि मोठ्या आचेवर शिजवा. आणि गरमा-गरम सर्व्ह करा.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com