Dinkache ladoo
Dinkache ladoo

डिंकाचे लाडू बनवण्याची रेसिपी आणि हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे

डिंकाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी आणि हिवाळ्यात त्याचे फायदे जाणून घ्या. शरीराला ऊर्जा देणारे आणि हाडांची मजबुती वाढवणारे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते जाणून घेऊया.
Published by :
Published on

डिंकाचे लाडू हिवाळ्यात शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यांना बनवण्यासाठी डिंक, गूळ, तूप, काजू-बदाम, वेलची पावडर आणि खसखस यांचा वापर केला जातो. हिवाळ्यात डिंकाचे लाडू शरीराला ऊर्जा देतात, कारण डिंकामध्ये प्रोटीन आणि फायबर्सचे प्रमाण अधिक असते. ते शरीराचे तापमान वाढवून थंडीपासून संरक्षण करतात. डिंक आणि गूळ हाडांची मजबुती वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी मदत करते.

डिंकाचे लाडू बनवण्याची रेसिपी:

साहित्य:

अर्धा कप डिंक

२ कप तूप

२ कप किसलेला गूळ

१/२ कप काजू आणि बदाम (चिरलेले)

१/२ चमचा चमचा वेलची पावडर

१/४ कप खसखस

४ कप गव्हाचं पिठ

१/४ कप सुक्या खोबऱ्याचा किस

कृती:

एका कढईत तूप गरम करा आणि त्यात डिंक तळून घ्या. डिंक हलके तडतडायला लागल्यावर ते कढाईत बाजूला काढा. त्याच कढईत काजू, बदामचे काप तळून घ्या. (काजू-बदाम तुपात तळून घेतल्याने खुसखुशीत लागतात.) आता खसखस कढईत टाकून तडतडू द्या. त्यानंतर सुकं खोबरं तुपाशिवाय भाजून घ्या. आता डिंक, तळलेला सुका मेवा, खसखस, सुकं खोबरं बाजूला ठेवा. आता याच कढईत गव्हाचे पीठ खरपूस भाजून घ्या. गव्हाच्या पिठाला चॉकलेटी रंग आणि खमंग वास सुटला की कढईतून काढून बाजूला ठेवा.

आता किसलेल्या गूळ कढईत घाला. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत कढईत ठेवा. त्यात आता भाजलेले गव्हाचे पीठ घाला. वेलची पावडर घालून वरील सर्व जीन्नस घाला आणि एकत्र करीत करा. मिश्रण चांगले एकजीव होईल. मिश्रण थोडं थंड होऊ द्या, आणि नंतर हाताने लाडू वाळण्यास सुरुवात करा. लाडू तयार झाल्यावर त्यावर थोडी खसखस आणि नारळाचा किस घालून सजावट करा. आता लाडू खाण्यासाठी तयार आहेत!

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com