चटकदार
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा श्रीखंडाची रेसिपी...
सणाच्या निमित्ताने तुम्ही श्रीखंड बनवू शकता.
सणाच्या निमित्ताने तुम्ही श्रीखंड बनवू शकता. आजकाल लोक वेगवेगळ्या व्हेरिएशनसह ते बनवू लागले आहेत. आता येणारा सण कृष्ण जन्माष्टमी. या दिवशी श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून देखील आपण श्रीखंड बनवू शकतो.
श्रीखंड बनवण्यासाठी साहित्य
500 ग्रॅम घट्ट दही
150 ग्रॅम आईसिंग शुगर
3 ग्रॅम वेलची पावडर
5 ग्रॅम केशर
2 थेंब गुलाब पाणी
10 मिली (पर्यायी) दूध
ड्राय फ्रूट गार्निशिंगसाठी
श्रीखंड बनवण्याची पद्धत
1. केशर ३ ते ४ तास दुधात भिजत ठेवा.
2. सर्व साहित्य एकत्र करून त्यानंतर दही, पिठीसाखर, वेलची पावडर आणि केशर दूध एकत्र मिक्स करून सर्व्हिंग बाऊलमध्ये श्रीखंड काढा.
3. यानंतर ते ड्रायफ्रूट्सने सजवा आणि सर्व्ह करण्यापूर्वी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.