Street-Style Chowmein Noodles: घरच्याघरी मसालेदार स्ट्रीट-स्टाईल चाउमीन नूडल्स बनवायचे आहेत? मग 'ही' रेसिपी नक्की वाचा...

Street-Style Chowmein Noodles: घरच्याघरी मसालेदार स्ट्रीट-स्टाईल चाउमीन नूडल्स बनवायचे आहेत? मग 'ही' रेसिपी नक्की वाचा...

लहान मुलांना नूडल्स खायला खूप आवडतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी घरच्याघरी मसालेदार स्ट्रीट-स्टाईल चाउमीन नूडल्स कसे बनवायचे याची रेसिपी घेऊन आलो आहोत.
Published on

लहान मुलांना नूडल्स खायला खूप आवडतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी घरच्याघरी मसालेदार स्ट्रीट-स्टाईल चाउमीन नूडल्स कसे बनवायचे याची रेसिपी घेऊन आलो आहोत.

स्ट्रीट-स्टाईल चाउमीन नूडल्ससाठी लागणारे साहित्य

हिरवी, पिवळी आणि लाल भोपळी मिरची

गाजर

कोबी

काळी मिरी पावडर

चिली सॉस

टोमॅटो केचप

सोया सॉस

व्हिनेगर

स्ट्रीट-स्टाईल चाउमीन नूडल्स बनवण्यासाठीची कृती

स्ट्रीट-स्टाईल चाउमीन नूडल्स बनवण्यासाठी नूडल्स उकळताना त्यात थोडे मीठ टाका आणि उकळेपर्यंत त्यावर झाकण ठेवा. हिरवी, पिवळ्या आणि लाल भोपळी मिरची, गाजर, कोबी, कांदा आणि टोमॅटो चिरुन घ्या. उकडलेल्या नूडल्ससोबत चिरलेल्या भाज्या नॉनस्टिक तव्यावर मिक्स करा. त्यात ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, चिली सॉस, हिरव्या मिरचीचा सॉस, टोमॅटो केचप, सोया सॉस आणि व्हिनेगर हे सगळ टाकून ते मिक्स करुन शिजवा. अशा प्रकारे तुमचे स्ट्रीट-स्टाईल चाउमीन नूडल्स तयार होतील. तयार झालेले नूडल्स एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घ्या आणि मसालेदार स्ट्रीट-स्टाईल चाउमीन नूडल्सचा आस्वाद घ्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com