कडधान्याची भाजी खाऊन कंटाळले आहात का? कडधान्यापासून बनवा गरमा-गरम कडधान्याचा पौष्टिक डोसा

कडधान्याची भाजी खाऊन कंटाळले आहात का? कडधान्यापासून बनवा गरमा-गरम कडधान्याचा पौष्टिक डोसा

कडधाने पौष्टिक असल्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात. कडधान्याची भाजी आणि उसळ प्रत्येकाने खाल्ली आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय पौष्टिक कडधान्यापासून बनवलेला कडधान्याचा डोसा.
Published by :
Team Lokshahi

कडधान्याचा डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

पनीर

बटर

रवा

पाणी

कांदा

मोड आलेले मूग

मोड आलेले चणे

कोथिंबीर

हिरवी मिरची

कडधान्याचा डोसा बनवण्याची कृती:

सर्वप्रथम कांदा बारीक चिरुन घ्या. नंतर पनीर किसून घ्या. यानंतर एका बाऊलमध्ये मोड आलेले मूग, मोड आलेले चणे, कोथिंबीर, हिरवी मिरची, रवा, पाणी आणि त्यात चवीनुसार मीठ घालून ते सर्व मिश्रण मिक्सरला वाटून घ्या. अशा प्रकारे डोश्याचे पीठ तयार होईल. नॉन-स्टीक पॅनवर बटर लावून तयार केलेले डोश्याचे पीठ खोलगट चमच्याचा वापर करून एक-एक चमचा घेऊन त्यावर पसरवा आणि डोस्यासारखा गोल आकार द्या.

त्यावर चिरलेला कांदा आणि किसलेला पनीर टाका आणि डोसा थोडा गोल्डन ब्राऊन रंगाचा झाल्यास त्याला एका प्लेटमध्ये छान सर्व्ह करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही पावसाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेते स्वादिष्ट कडधान्याच्या डोस्याचा आनंद घेऊ शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com