makhana barfi
makhana barfigoogle

कच्चा किंवा भाजलेला मखना खाऊन कंटाळा आला आहे, तर घरच्याघरी बनवा स्वादिष्ट गोड मखाना बर्फी

जर तुम्हाला मखना कच्चा किंवा भाजलेला खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्हीसुद्धा बनवू शकता मखानाची गोड मखाना बर्फी.आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मखाना, दुध आणि काजू घालून बनवलेली एक सोपी आणि साधी रेसिपी.
Published by :
Team Lokshahi
Published on

मखाना बर्फीसाठी लागणारे साहित्य:

100 ग्रॅम - मखना

4-5 वेलची

किसलेला नारळ

शेंगदाणे

300 ग्रॅम दूध पावडर

१/२ कप साखर

मखाना बर्फी बनवण्याची कृती:

मखाना बर्फी बनवण्यासाठी मखाना नॉन-स्टिक पॅनमध्ये भाजून घ्या. त्यात 5-6 मिनिटे शेंगदाणे परतून घ्या. आता ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये दूध आणि साखर उकळेपर्यंत गरम करा. मखाना आणि शेंगदाण्याची बारीक केलेली पावडर उकळलेल्या दूधात टाका आणि नीट ढवळत राहा, पॅनमध्यलं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवा. नंतर बर्फीचा आकार देऊन मखना बर्फी तयार करा. अशा प्रकारे स्वादिष्ट मखाना बर्फी तयार होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com