मेहंदीचा रंग जास्त गडद होण्यासाठी करून पहा 'हे' उपाय

मेहंदीचा रंग जास्त गडद होण्यासाठी करून पहा 'हे' उपाय

मेहंदी काढायला सर्वांनाच आवडते लहाण मुलींपासून ते अगदी मोठ्या स्त्रियांपर्यंत अगदी सर्वांनाच. कोणाला हातभर, मोठी भारतीय पद्धतीने काढलेली मेहंदी आवडते तर कोणाला छोटीशी अरेबिक. मग कशीही चालेल मात्र मेहंदी ही हवीच. कोणताही सण असो वा समारंभ (festivals), लग्न अशा विविध कार्यक्रमांच्यावेळी स्त्रियांच्या हातावर मेहंदी काढलेली दिसते.

मेंहदी जेवढी गडद होते, तेवढाच त्याचा रंग खुलून दिसतो. पण काहींच्या हातावरील मेहंदीचा रंग जास्त चढत नाही. तर ही मेहंदी जास्त गडद होण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

मेंहदी काढण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हातावर मेहंदी काढून ती व्यवस्थित सुकू द्या. लगेच पाण्याने धुवू नका. मेहंदी वाळल्यानंतर ती पाण्याने न धुता तेल लावून काढावी

मेहंदी नीट सुखल्यानंतर लिंबूचा रस आणि त्यात साखर घालून ते मिश्रण नीट मिक्स करा आणि कापसाच्या बोळ्याने मेहंदीवर नीट लावा. हे मिश्रण हातावर लावल्याने मेहंदी हातावर चिकटून राहते आणि पडत नाही.

लवंगाचे तुकडे तव्यावर टाकूण मेहंगी लावलेला हात तव्यावरून फिरवत, लवंगांच्या धुराचा नीट शेक घ्या. तसेच व्हिक्स किंवा आयोडेक्स, बामही गरम असतात, ते मेहंदी काढलेल्या हातावर लावल्यास त्याचा रंग गडद होतो.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com