TVS मोटरची नॉर्टन बाईक भारतात लाँच, Royal Enfield ला आव्हान

TVS मोटरची नॉर्टन बाईक भारतात लाँच, Royal Enfield ला आव्हान

टीव्हीएस मोटरची नॉर्टन बाईक भारतात लाँच, रॉयल एनफिल्डला थेट स्पर्धा
Published by :
Shamal Sawant
Published on

भारतात प्रीमियम बाईक सेगमेंटमध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी टीव्हीएस मोटर कंपनीने नवा पाऊल उचलले आहे. रॉयल एनफिल्डसारख्या लोकप्रिय बाईक ब्रँडला टक्कर देण्यासाठी टीव्हीएस लवकरच ब्रिटिश ब्रँड नॉर्टन मोटरसायकल्सची प्रीमियम बाईक भारतीय बाजारात लाँच करणार आहे.

६ मे रोजी भारत-ब्रिटन मुक्त व्यापार कराराला (FTA) मंजुरी मिळाल्यानंतर, टीव्हीएसचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू यांनी या वर्षाअखेर नॉर्टन बाईक भारतात आणण्याची अधिकृत घोषणा केली. करारामुळे ब्रिटनमध्ये तयार होणाऱ्या बाईक्सवर आयात शुल्क १०० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर येणार आहे. त्यामुळे नॉर्टनच्या बाईक आता भारतीय ग्राहकांसाठी अधिक परवडणाऱ्या ठरणार आहेत.

टीव्हीएसने आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या नॉर्टन कंपनीचे २०२० मध्ये १५३ कोटी रुपयांना अधिग्रहण केले होते. त्यानंतर भारतीय कंपनीने जवळपास १००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून बाईक्सच्या डिझाइनपासून उत्पादनापर्यंत सर्व स्तरांवर मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या आहेत.

टीव्हीएस कमिंग क्वार्टरमध्ये नॉर्टनची कमांडो 961, V4 SV आणि V4 CR ही प्रीमियम बाईक्स भारतात सादर करणार आहे. या बाईक्स CBU (Completely Built Units) स्वरूपात येतील आणि युनायटेड किंगडममधील सोलिहल फॅक्टरीत तयार केल्या जातील. भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याआधी नॉर्टन ब्रँड बाईकप्रेमींसाठी एक स्टायलिश पर्याय म्हणून वापरण्यात येणार आहे.

कंपनी २०२७ पर्यंत ६ नवीन बाईक्स बाजारात आणण्याचा मानस असून यातील काही बाईक्स भारतातच तयार केल्या जातील. नॉर्टन सध्या 300cc-400cc सेगमेंटवर काम करत आहे, जे रॉयल एनफिल्ड, ट्रायम्फ, हार्ले डेव्हिडसन यांसारख्या ब्रँड्सना थेट स्पर्धा देईल.

सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ दरम्यान, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नॉर्टन ब्रँडची अधिकृत लॉन्चिंग होण्याची शक्यता आहे. या नव्या करारामुळे नॉर्टनसह ट्रायम्फ, रोल्स रॉयस, बेंटले, मॅकलारेन यांसारख्या अनेक ब्रिटिश ब्रँड्सना भारतात मोठा फायदा होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com