VIDEO : प्रशांत महासागरात महिलेने बाळाला दिला जन्म
सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला समुद्रात बसून बाळाला जन्म देत आहे. हा व्हिडिओ लाखो लोक पाहत आहेत आणि या महिलांला सलाम करत आहेत.
या महिलांचे नाव जोसी प्यूकर्ट (Josie Puert) आहे आणि ती 37 वर्षांची आहे. जोसी चौथ्यांदा आई झाली आहे. जोसी आणि तीच्या पार्टनरने प्रशांत महासागर (Ocean) बाळाला जन्म दिला. प्रेग्रेंसी दरम्यान त्यांनी एकही सोनोग्राफीही (Sonography) केली नाही. ही संपूर्ण प्रक्रियेला त्यांनी ‘फ्री बर्थ’चे (Free birth) नाव दिले आहे. जोसीचा उद्देश असा होता की वैद्यकीय मदतीशिवाय नैसर्गिक पद्धतीने प्रसूती शक्य आहे.
जोसी तिच्या बाळंतपणाच्या अनुभवाबद्दल सांगतले की तिच्या पहिल्या मुलाचा जन्म हॉस्पिटलच्या देखरेखीखाली झाला. पण तीला खूप वेदना सहन कराव्या लागल्या. दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलांचा जन्म घरी झाला आणि त्यादरम्यान त्यांना एक दाई होती.
जोसीला जेव्हा लेबर पेन (Labor pain) सुरु झाला तेव्हा ती आणि तीचा पार्टनर समुद्रकिनारी गेले. यादरम्यान त्यांची मुले नातेवाईकांकडे गेली. या जोडप्याने टॉवेल, नाळ धरण्यासाठी वाटी, कागदी टॉवेल यासारख्या मूलभूत गोष्टी बर्थ टूल किटच्या (Birth tool kit) नावावर ठेवल्या. आणि मग प्रक्रिया सुरू केली. जोसीचा पती या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओ बनवत राहिला.