फी वाढीबाबत शाळेबाहेर पालकांचं आंदोलन

फी वाढीबाबत शाळेबाहेर पालकांचं आंदोलन

Published by :
Published on

कल्याण येथील प्रसिद्ध असलेल्या बिर्ला शाळेबाहेर आज पालकांनी फी वाढी विरोधात काळ्या फिती बांधून आंदोलन केले. बिर्ला शाळा प्रशासनाने यंदाच्या वर्षी 20 टक्के वाढ केली आहे. ही फी वाढ बेकायदेशीर असल्याचा आरोप पालकांनी करत शाळेबाहेरच ठिय्या आंदोलन करत शाळा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

शाळेने फी वाढ मागे घ्यावी अशी मागणी केली. या आंदोलनानंतर शाळा प्रशासनाने आंदोलन करणाऱ्या पालकांना चर्चेसाठी बोलावलं. या चर्चेमध्ये शाळा प्रशासनाने ही वाढ मागे घेण्यास नकार दिल्याची माहिती पालकांनी दिली आहे. त्यामुळे यापुढेही शाळे विरोधात आंदोलन करणार असल्याचं आपली भूमिका पालकांनी स्पष्ट केली. शाळेच्या या निर्णया विरोधात शिक्षण मंत्र्यांसह न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा पालकांनी दिला. तर याबाबत शाळा प्रशासनाने कोरोना काळात 2019 पासून आम्ही कोणतीही फी वाढ केली नव्हती. यंदा नियमानुसार फी वाढ केली आहे. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाही त्याना फी मध्ये सवलत देण्यात आली आहे. तसेच चार ते सहा टप्प्यात फी भरण्याची मुभा दिली आहे. फीवाढी संदर्भात न्यायालयात प्रकरण असून न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असल्याचे शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com