Uncategorized
Oxygen tank leak; मिरजेत शासकीय कोविड रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती
मिरज शासकीय कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला बुधवारी रात्री अचानक गळती लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी जिल्हाधिकाऱ्यासह सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.
मिरज शासकीय कोविड रुग्णालयाच्या सहा हजार लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन टँकला गळती लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दलासह जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकची गळती काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहेत.
विशेष म्हणजे रुग्णालयात आणखी दोन टँक उपलब्ध असल्यामुळे कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सिव्हिल प्रशासनाने स्पष्ट केले. ऑक्सिजन टँकची गळती काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.