पेट्रोल-डिझेलचे दर जारी; मुंबईसह देशातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय?

पेट्रोल-डिझेलचे दर जारी; मुंबईसह देशातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय?

Published by :
Published on

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जारी केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. तरीही देशात इंधनाचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारनं 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर काही राज्य सरकारांनीही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला होता. तेव्हापासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे .

देशातील प्रमुख महानगरांतील दर

देशातील प्रमुख शहरं पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर
मुंबई 109.98 94.14
दिल्ली 95.41 86.67
चेन्नई 101.40 91.43

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com