राज्यात धुळवडीचा उत्साह; राजकीय मंडळींनी उधळले रंग
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुध्दा आपल्या परिवारासोबत धुळवड साजरी केली. यावेळी त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील होते.

आपल्या कुटुंबासोबत धुळवड साजरी केल्यानंतर त्यांनी परिसरातील लोकांना स्वत: हा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या पत्नीना रंग लावताना.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज कार्यकत्यांसोबत धुळवड साजरी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पत्नी अमृता फडणवीस यांनी सुध्दा आपल्या मुलीसोबत धुळवड साजरी केली. त्या क्षणाचा व्हिडोओ त्यांनी सोशल मिडियावर शेअर केला.

राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राजकीय स्टाईलमध्ये कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी करताना.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सुध्दा घरातच धुळवड साजरी केली. या सोबतच त्यांनी नागरिकांना शुभेच्छाही दिल्या.

काही दिवसांपुर्वी मनसेचे नेते यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला होता. तरिही दुखापत झालेली असताना देखील त्यांनी आज धुळवड साजरी केली.
