फोटो गॅलरी
निखिल पटेलसोबत विवाहबंधनात अडकली दलजीत कौर; फोटो आले समोर
टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर आणि निखिल पटेल 18 मार्च रोजी विवाहबंधनात अडकले आहेत.

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर आणि निखिल पटेल 18 मार्च रोजी विवाहबंधनात अडकले आहेत.

दलजीत आणि निखिलच्या लग्नात फक्त मित्र आणि कुटुंबीयच उपस्थित होते. करिश्मा तन्ना, वरुण बंगेरा आणि रिद्धी डोगरा यांच्यासह टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनीही लग्नाला हजेरी लावली होती.

या विवाह सोहळ्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दलजीत कौरने ऑफ-व्हाइट लेहेंगासह चमकदार लाल दुपट्टा घातला होता.

तिने डायमंड ज्वेलरी आणि नोज रिंगसह लूक पूर्ण केला.

नववधूच्या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

दलजीतला एक मुलगा आणि निखिलला दोन मुली आहेत. यासोबत दोघांनीही फॅमिली फोटो काढला.

दलजीत कौर म्हणाली, जेव्हा जीवन तुम्हाला दुसरी संधी देते, तेव्हा तुम्ही त्याची अधिक कदर करता आणि जोखीम आणि जबाबदाऱ्या देखील ओळखता.

दलजीत मुलासह आफ्रिकेत शिफ्ट होणार आहे.