सोशल मीडियावर 'हर हर शंभू' गाण्याचा डंका; फरमानी नाही तर 'ही' आहे खरी गायिका

सोशल मीडियावर 'हर हर शंभू' गाण्याचा डंका; फरमानी नाही तर 'ही' आहे खरी गायिका

सध्या तरुणांपासून वृध्दांपर्यंत एकच गाणे गुणगुणत आहेत. 'हर हर शंभू' गाण्याला आज लाखोंच्या घरात ज आहेत.

सध्या तरुणांपासून वृध्दांपर्यंत सर्वच जण एकच गाणे गुणगुणत आहेत. ते म्हणजे 'हर हर शंभू'. दोनच महिन्यांपुर्वीच हे गाणे युट्युबवर रिलीझ झाले होते. आणि या गाण्याला आज लाखोंच्या घरात व्ह्यूज आहेत. मध्यंतरी, 'हर हर शंभू' हे गाणे मुस्लीम सिंगर फतिमाने गायले असल्याची चर्चा होती. परंतु, या गाण्याची ओरिजनल सिंगर अभिलिप्सा पांडा.

अभिलिप्सा पांडा ही लहानपणापासूनच सिंगिगची ट्रेनिंग घेत आहे. तिच्या कुटुंबाची पार्श्वभूमी कलेशी निगडीत आहेत. आजोबा पश्चिम ओडिशाचे प्रसिद्ध कथाकार आहेत. तर, आई शास्त्रीय गायन आणि ओडिसी नृत्यात माहिर आहे.

अभिलिप्सा पांडा एका मुलाखतीत म्हणाली की, संगीताची सुरुवात माझ्या आजीपासून झाली. ती मला मंत्र म्हणायला शिकवायची आणि मी ते मंत्र सुरात म्हणायचे. तेव्हापासून माझ्या गायनाचा प्रवास सुरू झाला.

अभिलिप्सा पांडा वयाच्या चौथ्या वर्षापासून संगीत शिकत आहे. पूर्वी ती ओडिसी शास्त्रीय संगीत शिकत होती. त्यानंतर तिने 2015 मध्ये एका संस्थेतून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. ती तब्बल 8 वेगवेगळ्या भाषांमध्ये गाऊ शकते.

गायनासोबतच अभिलिप्सा कराटे चॅम्पियन आहे. राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले आहे. शिवाय ती ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहे.

कराटे शिक्षकाने तिची ओळख जीतू शर्माशी करून दिली. त्यानंतर 'हर हर शंभू' हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले.

अभिलिप्सा नकतीच बारावीची परीक्षा पास केली आहे आणि ती संगीतासोबतच अभ्यासावरही लक्ष केंद्रित करत आहे.

अभिलिप्साला संगीत, खेळ, वादविवाद स्पर्धा, नृत्य याशिवाय प्रवासाचीही आवड आहे.

'हर हर शंभू' व्यतिरिक्त अभिलिप्साने 'भोलेनाथ जी' आणि 'मंजिल केदारनाथ' सारख्या भजनांनाही आवाज दिला आहे.

Lokshahi
www.lokshahi.com