काय सांगता! महिलेने केले घटस्फोटाचे फोटोशूट; तुम्ही पाहिले का?

काय सांगता! महिलेने केले घटस्फोटाचे फोटोशूट; तुम्ही पाहिले का?

तुम्ही आत्तापर्यंत प्री-वेडिंग शूट, वेडिंग शूट, मॅटर्निटी शूट बद्दल ऐकले असेल आणि स्त्रियांना हे करताना पाहिले असेल. पण घटस्फोटाचे फोटोशूट तुम्ही ऐकले किंवा पाहिले आहे का?

तुम्ही आत्तापर्यंत प्री-वेडिंग शूट, वेडिंग शूट, मॅटर्निटी शूट बद्दल ऐकले असेल आणि स्त्रियांना हे करताना पाहिले असेल. पण घटस्फोटाचे फोटोशूट तुम्ही ऐकले किंवा पाहिले आहे का? यावर तुमचाही विश्वास बसला नसेल. पण, एका महिलेने पतीपासून घटस्फोट घेतल्याच्या आनंदात घटस्फोटाचे फोटोशूट केले असून यादरम्यान ती खूप आनंदी दिसत आहे.

या महिलेच्या घटस्फोटाचे फोटोशूट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये महिला आनंदाने फोटो फाडताना दिसत आहे.

दुसरीकडे दुसऱ्या फोटोत ही महिला हातात दारूची बाटली धरून घटस्फोटाचा आनंद साजरा करत आहे. तिच्या दुसर्‍या हातात एक पोस्टर देखील आहे. यामध्ये इंग्रजीमध्ये लिहिले आहे की मला 99 समस्या आहेत, परंतु पती नाही.

तर, ही महिला लग्नाच्या फोटोला पायाने चिरडताना दिसत आहे.ही महिला कोण आहे आणि ती कुठे राहते याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नसली तरी घटस्फोटाच्या फोटोशूटमध्ये ती नक्कीच खूप आनंदी दिसत आहे.

दरम्यान, एका आठवड्यापूर्वी अमेरिकेत आणखी एका महिलेने घटस्फोट मिळाल्याचा आनंद साजरा केला होता आणि फोटोशूट केले होते. महिलेने तिच्या लग्नाचे कपडे जाळले आणि सांगितले की हा तिने आतापर्यंत घेतलेल्या सर्वोत्तम निर्णयांपैकी एक होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com