बिहार विधानसभेत धक्काबुक्की…सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा

बिहार विधानसभेत धक्काबुक्की…सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा

Published by :
Published on

मुझफ्फरपूरमध्ये एका शाळेत अवैध दारूसाठा सापडला होता. या मुद्द्यावरून सभागृहात विरोधीपक्ष म्हणजेच आरजेडीने आक्रकम भूमिका घेतली. यावरून महसूल मंत्री रामसुरत राज यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले. सभागृहात धक्काबुक्की आणि शिवीगाळ सुरू झाली. सत्ताधारी आणि विरोधांनी सभागृहातच राडा घालायला सुरुवात केली.

मुझफ्फरपूरमध्ये रामसुरत राज यांच्या भावाकडून चालवण्यात येणाऱ्या शाळेत अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणावरून विधानसभेत विरोधकांनी नितीशकुमार सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

मुद्दा तापलेला असतानाच आरोग्य विभागाच्या बजेटवरील चर्चेदरम्यान, तेजस्वी यादव यांनी पुन्हा दारूबंदीवर बोलण्यात सुरुवात केली. विरोधीपक्षनेते पद हे घटनात्मक असते. मात्र उपमुख्यमंत्री पद घटनास्तमक नसते असा टोला तेजस्वी यादव यांनी लगावला. त्यावरून सत्ताधारी आणखी तापले.

तेजस्वी यादव यांच्या विधानावर भाजपाचे आमदार संजय सरावगी आणि मंभी जनक राम यांनी आक्षेप घेतला. यानंतर वातावरण आणखी तापले आणि दोन्ही गट एकमेकांसमोर आले. या दरम्यान तेजस्वी यांचे बंधू तेजप्रताप सत्ताधाऱ्यांकडे अंगुलीनिर्देश करत काहीतरी बोलले. यामुळे आगीत तेल ओतले गेले. आणि थेट धक्काबुक्की सुरू झाली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com