Vidhansabha Election
Pravin Darekar: राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार, निवडणुकीवर प्रवीण दरेकरांचं वक्तव्य
मराठवाड्यामध्ये महायुतीसाठी सकारात्मक वातावरण असताना राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.
मराठवाड्यामध्ये महायुतीसाठी सकारात्मक वातावरण असताना राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या दौऱ्यावर आल्यावर प्रवीण दरेकरांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
यापार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर म्हणाले की, दोन वर्ष शिंदे साहेबांच्या, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार कसं अपयशी आहे हे आपण सांगू शकत नाही, कारण दोन वर्षाच्या कालावधीत गरीबांच्या कल्याणासाठी आणि सर्वसामान्यांनसाठी अनेक लाभाच्या योजना आणल्या. सर्व समाजातील घटकांसाठी समाधान देण्याच आणि विकासाची भूमिका याठिकाणी महायुतीने घेतली आहे. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता महायुतीमागे उभी राहिल असा आम्हाला पुर्ण आत्मविश्वास आहे.