G20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी रोमला रवाना

G20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी रोमला रवाना

Published by :
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच G20 शिखर परिषदेसाठी रोमला पोहोचणार आहेत. "नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचा इटलीची राजधानी रोमचा हा पहिलाच दौरा आहे, असं इटलीतील भारताच्या राजदूत नीना मल्होत्रा यांनी सांगितलं. रोमला पोहोचल्यानंतर काही तासांनी, मोदी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गांधी पुतळ्याला भेट देतील आणि नंतर साडेपाच वाजता इटालियन पंतप्रधान मारियो द्राघी यांची भेट घेणार आहेत.

G20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या इटली भेटीपूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले की, "ते रोममध्ये या महामारीत जागतिक आर्थिक आरोग्य सुधारण्यावर चर्चा करतील. मोदी २९-३१ ऑक्टोबर दरम्यान रोम आणि व्हॅटिकन सिटीला भेट देणार आहेत आणि नंतर यूकेला जाणार आहेत. ब्रिटनमधील ग्लासगो येथे पंतप्रधान मोदी कार्बन स्पेसच्या न्याय्य वितरणासह हवामान बदलाच्या मुद्द्यांवर सर्वसमावेशकपणे लक्ष देण्याची गरज यावर बोलतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com