मतमोजणीबाबत सबळ पुरावे सादर करा- राज ठाकरे
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. एकीकडे महायुतीला घवघवीत यश मिळाले. तरी महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून पेच कायम आहे. तर दुसरीकडे पराभूत पक्षांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, त्याबाबत विचारमंथन सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. यामध्ये पराभूत उमेदवारांची मत जाणून घेतली. तसेच राज ठाकरे यांनी ईव्हीएम बाबत शंका व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तर विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला. मात्र, मनसेचा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला. मनसेने आपली संपूर्ण ताकद पणाला लावून १२५ हून अधिक उमेदवार उभे केले होते. मात्र, मनसेला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. त्यानंतर राज ठाकरे यांनी आज पराभूत उमेदवारांची बैठक घेऊन आत्मचिंतन केलं आहे.
थोडक्यात
मनसेकडून पराभवाबाबत विचारमंथन
पराभूत उमेदवारांनी मतमोजणीबाबत सबळ पुरावे सादर करण्याच्या सूचना
ईव्हीएमबाबत व्यक्त केली सूचना
मतमोजणीबाबत सबळ पुरावे सादर करावेत- राज ठाकरे यांच्या सूचना
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. 'अविश्वसनीय तूर्तास' इतकच म्हणत ट्विटरवर राज ठाकरे व्यक्त झाले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये काही उमेदवारांची बैठक घेतली. तर आज महाराष्ट्रातील पराभूत उमेदवारांकडून त्यांच्या पराभवाची कारण जाणून घेतली. काही उमेदवारांनी मतमोजणीबाबत आक्षेप घेतला होता. त्यामुळे पराभूत उमेदवारांनी सबळ पुरावे सादर करावेत अशा सूचना राज ठाकरे यांनी बैठकीत दिल्या आहेत.
ईव्हीएमबाबत राज ठाकरे यांनी व्यक्त केली शंका
विधानसभा निवडणुकीत महायुतीला तुफान यश मिळाल्यानंतर विरोधकांकडून आता ईव्हीएमला दोष दिला जात आहे. ईव्हीएम मुळेच महायुतीचा विजय झाल्याचं विरोधकांकडून सांगितलं जात आहे. खरंतर राज ठाकरे यांनी याआधी सुद्धा ईव्हीएम विरोधात भूमिका जाहीर केली होती. साल २०१४ ला 'ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव' हा नाराही दिला होता. त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज ठाकरे यांच्यासोबत होते.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-