Vidhansabha Election
Raj Thackeray : ठाण्यात आज राज ठाकरे यांची प्रचारसभा
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.
थोडक्यात
ठाण्यात आज राज ठाकरे यांची प्रचारसभा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची पहिली सभा ठाण्यात होणार
संध्याकाळी 5 वाजता ब्रम्हांड सर्कल येथे होणार सभा
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत.
याच पार्श्वभूमीवर ठाण्यात आज राज ठाकरे यांची प्रचारसभा होणार आहे. अविनाश जाधव यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता ब्रम्हांड सर्कल येथे ही सभा होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची पहिली सभा ठाण्यात होणार असून राज ठाकरे या सभेतून काय बोलतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.