अभिमानस्पद! बुलडाण्याचा राजू केंद्रे फोर्ब्सच्या यादीत
बुलडाणा : फोर्ब्स मॅगझिननं नुकतेच प्रसिद्ध केलेल्या यादीत बुलडाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे येथील शेतकरी कुटुंबामधील राजू केंद्रेचे नाव आलं आहे. सध्या राजू केंद्रे सातासमुद्रापार म्हणजेच लंडनमध्ये चेवनिंग स्कॉलरशिप वर SOAS युनिव्हर्सिटीस ऑफ लंडनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीज शिकतो आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्सच्या यादीत फोर्ब्स 30 अंडर 30 मध्ये त्याचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर फोर्ब्सने त्याच्यावर एक स्टोरी सुद्धा प्रसिद्ध केली आहे. यामुळे या शेतकरी पुत्राचं बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात कौतुक होत आहे. फोर्ब्स इंडियाच्या यादीत नाव आल्यावर राजू केंद्रे वर एक स्टोरी सुद्धा प्रसिद्ध झाली असून लवकरच ऑनलाईन यादी ही प्रसिद्ध होईल.
शिक्षणाचा गंधही नसलेल्या गावाचा उंबरठा ओलांडत मजल दर मजल करत संकटावर मात करत लोणार सरोवराच्या भूमीतून राजू केंद्रेनं झेप घेतली.लंडनच्या विद्यापीठात शिवेनिंग शिष्यवृत्ती साठी निवड होण्याचे भाग्य राजू केंद्रे ला मिळालं आहे. आई-वडील जरी शेतकरी असले तरीही शिक्षणाच्या प्रवाहात अनेकांना आणायचे काम राजू केंद्रे यांनी केले आहे.
राजू हा एकलव्य इंडियाच्या माध्यमातून करिअरविषयी मार्गदर्शन ही करतो. शिक्षणाच्या पारंपरिक चौकटी ओलांडून ग्रामिण विद्यार्थ्यांमध्ये नवा दृष्टिकोन आणि आत्मविश्वास निर्माण करणायचा प्रयत्न ही करत असतो.