एलॉन मस्क नंतर आता हे आहेत ‘सर्वात श्रीमंत व्यक्ती’

एलॉन मस्क नंतर आता हे आहेत ‘सर्वात श्रीमंत व्यक्ती’

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क | एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते, पण एका आठवड्यात त्यांना मिळालेला मान हिसकावून घेण्यात आला आहे. आता ते जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्झ मॅगझिनने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी टेस्लाच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. जेफ बेजोस यांनीच त्यांना मागे टाकलं आहे. एकाच दिवसात एलॉन मस्क यांच्या संपत्तीमध्ये 14 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे,परिणामी ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर ढकलले गेले आहेत.

जेफ बेजोस 2017 सालापासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. एलॉन मस्क आता बेजोस यांच्या 6 अब्ज डॉलर मागे आहेत. जेफ बेजोस यांची नेटवर्थ 182.1 अब्ज डॉलर झाली आहे. सोमवारी अमेझॉनच्या शेअर्समध्ये देखील घसरण झाली होती. या घसरणीनतंर देखील त्यांनी मस्क यांना मागे टाकले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com