बिस्कीट खाल्लं नाही तर मुलांच्या जीवाला धोका, बिहारमध्ये अफवेचं सावट…
एका प्रसिद्ध कंपनीचं बिस्कीट खाण्यावरून बिहारमध्ये सध्या एकच धुमाकूळ उठला आहे. या अफवेमुळे बघता बघता दुकानांमधील या कंपनीचा पूर्ण स्टॉक संपायला आला आहे. बिहारच्या सीतामंधी भागात ही अफवा पसरली होती. बिहारमध्ये या काळात जितीय पर्व सुरु असते . या पर्वात महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात.
या उत्सवाच्या काळातच कोणीतरी अशी एफ अफवा पसरवली कि एका प्रसिद्ध कंपनीचे बिस्कीट नाही खाल्ले तर तुमच्या मुलाच्या जीवाला धोका निर्माण होईल किंवा काहीतरी बरवाईट होईल. हि अफवा नेमकी कोणी उठवली कळू शकले नाही पण बघता बघता ही अफवा बिहारच्या अनेक गावांत पसरली .या अफवेची भीती इतकी होती कि लोकांनी हातातले काम सोडून दुकानाकडे धाव घेतली. किराणा दुकानाच्या बाहेर बिस्कीट घेण्यासाठी तौबा गर्दी उसळती अचानक इतके ग्राहक झाल्यामुळे दुकानांत असलेल्या या बिस्कीटांचा साठा देखील संपला . काहींनी यामागे नेमकं काय कारण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांनी या अफवेला सत्य समजून दुकानांमधून बिस्कीट खरेदी केलीच. सध्या या भागात ही अफवा चर्चेचा विषय बनली आहे.