"गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही?" रोहित पवार यांचं ट्विट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महाविकास आघाडीला अनेक जागांवर पराभवाचा सामना करावा लागला. एकीकडे महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरून चर्चा आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून पराभवाबाबत विचारमंथन केलं जात असताना पुन्हा एकदा ईव्हीएमला लक्ष करण्यात आलं आहे.
थोडक्यात
ईव्हीएमवरुन रोहित पवार यांचं ट्विट
'गुजराती EVMच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही?'
ट्विट करत रोहित पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल
'विजयी उमेदवाराला मिळालेली मतं सारखी कशी?'
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील आमदार रोहित पवार यांनी ईव्हीएम मशिनवरून निशाणा साधला आहे. ईव्हीएमवरुन रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. 'गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही? अडकली आहे का असा सवाल त्यांनी विचारला आहे. 'विजयी उमेदवाराला मिळालेली मतं सारखी कशी?' असा सवाल रोहित पवार यांनी ट्वीट करत निवडणूक आयोगाला केला आहे.
रोहित पवार यांनी कोणते सवाल उपस्थित केले?
गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का?
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी?
निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं-काय खोटं हे सांगायला तयार नाही. आयोग नेमकं काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे?
लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे?
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
गुजराती #EVM च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का?
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी? एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो.
निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं - काय खोटं हे सांगायला तयार नाही. आयोग नेमकं काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे? की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत...
तरी आयोग जनभावना लक्षात घेऊन लवकरच स्पष्टीकरण देईल, ही अपेक्षा !
#महाराष्ट्र_विधानसभा_२०२४
पाहा रोहित पवार यांचं ट्विट-