मल्ल्याला दणका; ६२०० कोटींचे शेअर्स विकून किंगफिशरची होणार कर्जवसुली

मल्ल्याला दणका; ६२०० कोटींचे शेअर्स विकून किंगफिशरची होणार कर्जवसुली

Published by :
Published on

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नेतृत्वाखाली देशातील बँकाचा एक गट आर्थिक फसवणूक करुन पळून गेलेल्या विजय मल्ल्या याच्या तीन कंपन्यांमधील शेअर होल्डिंग विकून किंगफिशर विमान कंपनीला दिलेले ६२०० कोटींपेक्षा अधिक कर्जाची वसुली करणार आहे. यूनायटेड ब्रुवरीज लिमिटेड, यूनायटेड स्पिरिट्स लिमेटेड आणि मॅकडॉवेल होल्डिंग्स लिमिटेडमधील विजय मल्ल्याचे शेअर्स ब्लॉक डील्समध्ये २३ जून रोजी विकले जातील. विजय मल्ल्याच्या मालकीची किंगफिशर एअरलाइन्स ही कंपनी ऑक्टोबर २०१२ पासून बंद आहे.

दरम्यान, विजय मल्ल्याला जानेवारी २०१९ मध्ये कर्ज बुडवल्याप्रकरणी आणि बँकाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी देशातून पळून गेलेला गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

सध्या विजय मल्ल्या ब्रिटनमधील न्यायालयांमध्ये त्याला भारताच्या ताब्यात देण्याची जी मागणी करण्यात येत आहे. त्याविरोधात तो खटला लढत आहे. जर विजय मल्ल्याच्या मालकीच्या शेअर्सची विक्री झाली तर बँकाकडून किंगफिशर एअरवेज कर्ज प्रकरणामध्ये विजय मल्ल्याविरोधातील पहिली मोठी वसुली ठरणार आहे. किंगफिशरला देण्यात आलेले कर्ज हे २०१२ च्या शेवटी नॉन परफॉर्मिंग असेट (एनपीए) म्हणून जाहीर करण्यात आले होते. विजय मल्ल्याने मार्च २०१६ मध्ये भारतातून पळ काढला. १७ बँकांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com