राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) नुकतेच NEET UG 2025 चे निकाल जाहीर केले. यंदाच्या वर्षी देशभरातून तब्बल 22 लाख 9 हजार 318 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
परीक्षेतील पेपर फुटल्याच्या संशयावरून देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये फेरपरीक्षेची मागणी करणाऱ्या याचिका दाखल झाल्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली.