दसरा अगदी दारात आला असून या सणानिमित्त सोनं खरेदी करण्याची प्रथा जुनी आहे. मात्र यंदा सोन्याचे दर प्रचंड वाढल्याने सामान्य ग्राहकांसाठी दागिने खरेदी करणे अवघड झाले आहे.
बाजारपेठेत आज सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. एकीकडे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे तर दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी उसळी नोंदवली गेली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून विक्रमी दरामुळे सामान्य ग्राहक दागिने खरेदीपासून दूर गेले होते. आता मात्र येत्या काळात सोने–चांदीच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये भाव वाढ होत असताना दिसत आहे. मात्र अमेरिकेने भारतावर लावलेला 50% टेरिफ यामुळे सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.