राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 'या' नव्या उमेदवारांच्या नावांची केली घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 'या' नव्या उमेदवारांच्या नावांची केली घोषणा

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.
Published on

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सात नव्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये सुनील टिंगरे, झिशान सिद्दीकी, सना मलिक, संजय काका पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, निशिकांत पाटील, माऊली कटके, यांचा समावेश आहे. याच्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसनं 38 जणांच्या उमेदवारीची पहिली यादी जारी केली होती.

कुणाला मिळाली उमेदवारी?

वडगाव शेरी - सुनील टिंगरे

वांद्रे पूर्व - झिशान सिद्दीकी

अणूशक्तीनगर - सना मलिक

तासगाव - संजय काका पाटील

लोहा-कंधार - प्रताप पाटील चिखलीकर

इस्लामपूर - निशिकांत पाटील

शिरुर - माऊली कटके

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com