Vidhansabha Election
Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव
पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. पुण्यातील तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे. कसब्यात रवींद्र धंगेकर, पुरंदरमध्ये संजय जगताप तर भोरमध्ये संग्राम थोपटे यांचा पराभव झाला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा असलेल्या पुणे जिल्ह्यात देखील महायुतीने बाजी मारली आहे. १८ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर केवळ २ जागांवर महाविकास आघाडीला समाधान मानावे लागले आहे. तर पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. पुण्यातील तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे. कसब्यात रवींद्र धंगेकर, पुरंदरमध्ये संजय जगताप तर भोरमध्ये संग्राम थोपटे यांचा पराभव झाला आहे.