महाबळेश्वर परिसरात दवबिंदू गोठले

महाबळेश्वर परिसरात दवबिंदू गोठले

Published by :
Published on

सातरा | मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी पडल्याने लिंगमळा आणि वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठले आहेत. येथील वेण्णालेक, लिंगमळा परिसरात पारा 5 अंशावर घसरला आहे.

महाबळेश्वर मध्ये पारा पुन्हा एकदा खाली आला आहे. वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरातील सुमारे 2 किलोमीटरचा पट्ट्यात किमान तापमान 5 अंश सेल्सियस पर्यंत खाली उतरले. यामुळे त्याभागातील दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले. या भागात गाडीच्या टपावर शेतातील गवतावर, वेण्णालेक परिसरात सर्व ठिकाणी हिमकण गोठलेले पहायला मिळाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com