शरद पवार आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर; असा असेल दौरा
थोडक्यात
उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात
शरद पवार आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर
नागपूर, काटोल, तिरोडामध्ये प्रचारसभांचं आयोजन
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरणार आहेत. शरद पवार आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत. नागपूर, काटोल, तिरोडामध्ये शरद पवार यांच्या प्रचारसभांचं आयोजन करण्यात आले आहे.
असा असेल दौरा
सकाळी 11 वाजता पूर्व नागपूरचे उमेदवार दुनेश्वर पेठेंच्या प्रचारासाठी सभा
दुपारी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडात रविकांत बोपचे यांच्यासाठी सभा घेणार
सायंकाळी 5 वाजता काटोलमध्ये सलील देशमुख यांच्या प्रचारासाठी सभा
शरद पवार रात्री नागपूरमध्ये मुक्कामी असतील
उद्या हिंगणघाट, जिंतूर, वसमत मतदारसंघात प्रचारसभा