औरंगजेबासमोर नतमस्तक झाल्याचे दाखवा तुम्ही; इम्तियाज जलील यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
सचिन बडे | औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं टेकणारी जी औलाद आहे, तिच्यासोबत छत्रपतींचा महाराष्ट्र आणि त्यांचा सैनिक म्हणवणारा शिवसैनिक हा कदापि जाणार नाही असे विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एमआयएम (MIM Alliance) सोबत आघाडी करण्याची ऑफर धुडकावून लावली. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आता इम्तियाज जलील (Imtiyaz Zalil) यांनी औरंगजेबासमोर नतमस्तक झाल्याचे दाखवा तुम्ही, असे आव्हानच मुख्यमंत्र्यांना (CM Uddhav Thackeray) दिले आहे.
इम्तियाज जलील (Imtiyaz Zalil) पुढे म्हणाले, औरंगजेबच्या कबरीसमोर आम्ही नतमस्तक होतो, असं काही नाही आहे. औरंगजेब इतिहासातले एक पात्र होते. औरंगजेब होते याचा अर्थ असा होत नाही की सगळे मुसलमान जाऊन नतमस्तक होतात आणि गु़डघे टेकतात.तुम्ही दाखवाना आम्हाला अस काही असेल तर असे आव्हानच जलील (Imtiyaz Zalil) यांनी दिली आहे.
भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्याचा प्रयत्न
हा काही कट नाही, तसेच आम्ही कोणाच्याही बोलण्यावरून हे करत नाही आहोत. आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. या देशाला आणि राज्याला वाचवण्यासाठी आपल्याला भाजपला सत्तेपासून दुर ठेवावे लागेल. त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जे आम्हाला करता येईल ते आम्ही करू असे जलील (Imtiyaz Zalil) म्हणालेत. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार,भेटून बसून चर्चा करणार,तुम्ही बसून तर चर्चा करा असेही जलील (Imtiyaz Zalil) म्हणाले.
झोपेतही एमआयएमसोबत युती करणार नाही
एमआयएमसोबत (MIM Alliance) युती होणार नाही याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) यावेळी केला. झोपेतही एमआयएमसोबत (MIM Alliance) युती करणार नाही. ही भाजपाकडूनच ऑफर आल्याची १०० टक्के खात्री आहे. एमआयएम भाजपाची बी टीम असल्याची खात्री झाली आहे. धोका आहे त्यांना बदनाम आणि नामशेष करणं ही त्यामागची चाल आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केला.
औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं टेकणारी जी औलाद आहे, तिच्यासोबत छत्रपतींचा महाराष्ट्र आणि त्यांचा सैनिक म्हणवणारा शिवसैनिक हा कदापि जाणार नाही आणि मी जाऊ देणार नाही असा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केला. यावेळी त्यांनी भाजपाचं मुस्लीमप्रेम जनतेसमोर आणण्याचं आवाहनही केलं. शिवसैनिक हिंदुत्वाचा अंगार असतो हे त्या भंगारांना दाखवून द्या असंही उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले.