अध्यात्म-भविष्य
Shravan 2023 : आजपासून निज श्रावण मासारंभ; जाणून घ्या माहिती
आज 17 ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून निज श्रावण महिना सुरू झाला आहे.
आज 17 ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून निज श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहेत. यंदा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 हा श्रावण मास आहे. श्रावण महिन्यात अनेक महत्वाचे सण साजरे केले जातात.
यंदा एकूण 8 सोमवार असणार आहेत. ते कसे तर अधिक आणि निज असे दोन श्रावण महिने असतात. तर यंदा अधिक मास श्रावणाचे चार श्रावण सोमवार असतील. आणि यंदाचे निज श्रावणी सोमवार चार असणार.
या महिन्यात अनेक सण आपण साजरे करतो. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोपाळकाला असे सण श्रावणात येतात.
८ श्रावण सोमवार
पहिला सोमवार - २४ जुलै
दुसरा सोमवार - ३१ जुलै
तिसरा सोमवार - ७ ऑगस्ट
चौथा सोमवार - १४ ऑगस्ट
पाचवा सोमवार - २१ ऑगस्ट
सहावा सोमवार - २८ ऑगस्ट
सातवा सोमवार - ४ सप्टेंबर
आठवा सोमवार - ११ सप्टेंबर