Shri Jagannath Puri Rath Yatra 2021: आजपासून जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात

Shri Jagannath Puri Rath Yatra 2021: आजपासून जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात

Published by :
Published on

देशात कोरोनाचे संकट असतानाच आजपासून जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात होत आहे. ओडिशामधल्या पुरी येथे दरवर्षी ही यात्रा भरवली जाते. मात्र, यंदाच्या वर्षी करोना प्रादुर्भावामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत मर्यादित स्वरुपात ही रथयात्रा भरवली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात हजेरी लावत तिथे पूजा केली. देशातल्या अनेक नेत्यांनीही या यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.


अमित शाह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आरती करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी आपल्या ट्विटमध्ये त्यांनी भगवान जगन्नाथ यांचा आशीर्वाद सर्वांवर कायम राहो अशी प्रार्थनाही केली आहे. जगन्नाथ रथयात्रेच्या मंगल मुहुर्तावर मी अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरात होणाऱ्या आरतीमध्ये अनेक वर्षांपासून सहभागी होत आहे. प्रत्येकवेळी इथे आलं की एक वेगळीच उर्जा मिळते. आजही महाप्रभूंची आराधना करण्याचं सौभाग्य लाभलं. महाप्रभू जगन्नाथ सर्वांवर आपली कृपादृष्टी कायम ठेवो ही प्रार्थना! असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com