चिमुकला हात जोडून उकळत्या पाण्याच्या कढईत ध्यानावस्थेत बसला व्हिडीओ व्हायरल

चिमुकला हात जोडून उकळत्या पाण्याच्या कढईत ध्यानावस्थेत बसला व्हिडीओ व्हायरल

Published on

सोशल मिडीयावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये एक मुलगा उकळत्या पाण्याच्या कढईत बसला आहे. हा व्हिडियो सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं असून काही युजर्स या व्हिडीओला बनावट असल्याचे म्हणत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडियोत,' भल्या मोठ्या कढईत एक मुलगा बसलेल्या आहे. या कढईमध्ये पाणी असून हा मुलगा समाधी घेतलेल्या अवस्थेत बसला आहे. तर ही कढई चुलीवर ठेवण्यात आली आहे. चूल पेटलेली असून तेथे उपस्थित अनेक जन चुलीमध्ये लाकूड टाकून मोठी आग लावत आहे. दरम्यान याठिकाणी आजूबाजूलाही लोकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे.

हा व्हिडियो एक युजर्सने शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'हा 2021 चा भारत आहे'.या व्हिडियोचा अनेकांनी विरोध केला आहे तर काहींने कंमेंट्स करत कौतुक केले आहे. तर काही ह्या व्हिडियोला खोटे ठरवत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com